Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 12 December, 2010

निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी चौकशीत सहकार्य : ए. राजा

चेन्नई, ११ डिसेंबर: २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात आपण पूर्णपणे निर्दोष आहे, असा दावा माजी केेंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी पुन्हा एकदा केला असून, हे सिद्ध करण्यासाठी या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे.
‘सीबीआय सध्या २-जी स्पेक्ट्रमसंबंधीच्या सगळ्या कागदपत्रांची छाननी करत आहे. सीबीआयची तपास करण्याची जी कोणती कार्यपद्धती असेल त्यात पूर्णपणे सहकार्य करण्यास मी तयार आहे’, असे ए. राजा यांनी काल येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. या घोटाळ्यासंबंधी सीबीआयने राजा यांच्या नवी दिल्ली आणि चेन्नई येथील निवासस्थानांवर टाकलेल्या धाडीसंबंधी विचारले असता, कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही. त्यामुळे सीबीआयला जी कोणती मदत पाहिजे असेल ती करण्यास मी तयार आहे, असे राजा यांनी सांगितले.
स्पेक्ट्रम घोटाळ्यासंबंधी सीबीआयने ८ डिसेेंबरला ए. राजा आणि दूरसंचार खात्याच्या इतर चार अधिकार्‍यांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. याशिवाय राजा यांचा भाऊ आणि बहीण यांच्या तिरुचिरापल्ली व चेन्नई येथील निवासस्थानांची देखील झडती घेतली होती. सीबीआयने राजा यांचा निकटवर्ती असलेला सादिक पाशा याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली होती. या धाडसत्रात काही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळल्याचा दावाही सीबीआयने केला होता.

No comments: