पणजी, दि. १६ (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आदिवासी कल्याण खाते व आदिवासी आयुक्तांची नेमणूक ५ जानेवारी २०११ पर्यंत करण्याचे ठोस आश्वासन दिल्याने ‘उटा’तर्फे घोषित करण्यात आलेले १९ रोजीचे आंदोलन ५ जानेवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स’ (उटा) यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १९ रोजी पणजीत विराट मोर्चा आयोजित करण्याची घोषणा केली होती. यासंबंधी मुख्यमंत्री कामत यांनी काल १५ रोजी संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक बोलावून त्यांना संघटनेच्या दोन मुख्य मागण्या ५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या निर्णयाची माहिती संघटनेच्या सर्व सदस्यांना देण्यात येणार आहे. दरम्यान, संघटनेतर्फे जागृती अभियान मात्र सुरूच राहणार असून संघटनेच्या सर्व मागण्या धसास लावण्याचे प्रयत्न चालूच राहतील, अशी माहिती संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष एन. आर. फातर्पेकर यांनी दिली आहे.
Friday, 17 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment