सावर्डे, दि. १२ (प्रतिनिधी): कापसे सावर्डे येथे काल मध्यरात्री ३.३० वाजण्याच्या सुमारास खनिजमाल भरताना ‘एम. व्ही. मंदार, बी. पी. ११८८’ ही बार्ज एका बाजूला झुकली आणि जुवारी नदीत बुडाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आतील कर्मचार्यांनी ताबडतोब उड्या मारून किनारा गाठला. सुदैवाने त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बार्ज बुडाली तेव्हा त्यात निम्म्याहून अधिक माल भरण्यात आला होता. या बार्जची क्षमता आठशे टन माल नेण्याची असल्याचे सांगण्यात आले. जेटीवर एकाच बाजूने प्रमाणाबाहेर खनिज भरण्यात आल्यामुळे तोल जाऊन बार्जला जलसमाधी मिळाली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर खनिज पाण्यात मिसळले. तरीदेखील बर्याच प्रमाणात माल वाचवण्यात यश मिळाले. यापूर्वीदेखील याच प्रकारे सदर ठिकाणी बार्ज बुडाली होती. नदीचा हा भाग अरुंद असल्याने तेथून बार्ज हाकताना चालकाला कसरत करावी लागते.
Monday, 13 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment