तेलंगणवरील समितीचा अहवाल जाहीर
नवी दिल्ली, दि. ६ : आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात यावी, या मागणीवरून केंद्र सरकारने नेमलेल्या श्रीकृष्ण समितीचा अहवाल आज गृहमंत्रालयाने सार्वजनिक केला. या अहवालात समितीने सहा पर्याय सुचविले आहेत. मात्र, यातील पहिले तीन पर्याय अव्यवहार्य आहेत, असे श्रीकृष्ण समितीनेच सांगून ते ङ्गेटाळून लावले आहेत. ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ने (टीआरएस) श्रीकृष्ण समितीचा अहवाल ङ्गेटाळून लावताना वेगळ्या तेलंगण राज्याची निर्मिती व्हायलाच पाहिजे, असा सूर कायम ठेवला आहे.
राष्ट्रकुलप्रकरणी सीबीआयचे छापे
नवी दिल्ली, दि. ६ : कोट्यवधी रुपयांच्या राष्ट्रकुल घोटाळा प्रकरणी राष्ट्रकुल आयोजन समितीचे प्रमुख सुरेश कलमाडी यांची बुधवारी तब्बल आठ तास कसून चौकशी केल्यानंतर सीबीआयने राजधानी दिल्लीत कलमाडींच्या निकटवर्तीयांच्या दहा ठिकाणांवर धाडसत्र राबविले. सीबीआयने या प्रकरणी आज चौथा एङ्गआयआर नोंदविला.
पाकने निर्यात रोखल्याने कांदे पुन्हा महागले
चंदीगड, दि. ६ : भारतातील कांद्याची दरवाढ दिसत असतानाही पाकिस्तानने वाघा-अटारी या जमीन मार्गाने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. आज पाकिस्तानी प्रशासनाने पाकमधून कांदे घेऊन येणार्या एकाही ट्रकला भारतीय हद्दीत जाऊ दिले नाही. त्यामुळे कांद्याचे दर खाली आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न विफल ठरून कांद्याचे दर पुन्हा वाढलेय
आरुषी प्रकरणी आज निकाल
गाझियाबाद : आरुषी-हेमराज हत्याकांड प्रकरणाची चौकशी बंद करण्याच्या सीबीआयच्या अहवालावर उद्या विशेष न्यायालयात निर्णय घेतला जाणार आहे. विशेष न्यायाधीश प्रीतीसिंग यांच्या न्यायासनासमोर या अहवालावर सुनावणी होणार आहे. याच न्यायासनाने आरुषीच्या पालकांनी या खटल्याचा तपास बंद न करण्याची मागणी करणारी याचिका ङ्गेटाळली आहे.
कर्नाटक राज्यपालांचे अभिभाषण रोखले
बंगलोर : कर्नाटकात आज विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या आमदारांनी राज्यपाल हंसराज भारद्वाज यांना विधानसभेच्या संयुक्त सत्रात पारंपरिक संबोधनापासून रोखले. त्यांनी अभिभाषण वाचण्यास सुरुवात करताच विरोधी पक्षातील आमदार त्यांच्या पाया पडले आणि भाषण वाचू नका, अशी विनंती करू लागले. काही क्षण थांबल्यावर राज्यपाल तेथून निघून गेले. सत्ताधारी भाजपाविषयी राज्यपालांच्या नाराजीचे हे द्योतक असल्याचे बोलले जात आहे.
Friday, 7 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment