पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
बेळगावहून गोव्यात येणार्या भाजीचा पुरवठा फक्त एक दिवस बंद केल्यानंतर बेळगावातील ठोक दरात भाजी विकणार्या व्यापार्यांनी आज दि. ७ रोजी गोव्यात भाजी पाठवली. त्यामुळे भाजीअभावी ओस पडलेली भाजीची दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत. बेळगावातील भाजी गोव्यात दाखल झाल्यामुळे बेळगावच्या भाजीवर विसंबून असलेल्या गोव्यातील भाजीप्रेमींनी सुटकेचा सुस्कारा सोडला मात्र आज गोव्यात दाखल झालेली भाजी पूर्वीच्याच दरात म्हणजे महागच आहे. कांदे ६० रु. प्रति किलो तर टॉमाटो ३० रु. प्रति किलो दराने उपलब्ध आहेत. इतर भाज्यांच्या दरात मोठासा फरक नसून सर्व भाज्या महागच म्हणजेच ३५ ते ४० रु. प्रति किलो दराने विकण्यात येत आहेत.
Saturday, 8 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment