तीन लाखांचे अमलीपदार्थ जप्त
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): नववर्षाच्या पूर्वसंध्येला काल दि. ३१ रोजी गोवा अमली पदार्थ विरोधी पथकाने हणजूण येथे एका ऑस्ट्रियाच्या तरुणाला अमली पदार्थाची विक्री करताना ताब्यात घेतले.
राज्याचे गृहमंत्री जरी राज्यात अमली पदार्थाच्या व्यवहारावर नियंत्रण आणले असल्याचे सांगत असले तरी नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या विविध भागांत मोठ्याप्रमाणात अमलीपदार्थाचा व्यवहार झाला असल्याची शक्यता आहे.
काल दि. ३१ रोजी हणजूण येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ अमली पदार्थ विरोधी पथकाने वॉलीवर पिन्झ या २५ वर्षीय ऑस्ट्रियाच्या तरुणाला अमली पदार्थाची विक्री करताना मुद्देमालासह ताब्यात घेतले. अमली पदार्थ विरोधी पथकाने रात्रौ ८.३० च्या सुमारास वॉलीवर पिन्झ याला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याजवळ ‘एलएससी’ या अमली पदार्थाच्या गोळ्या सापडल्या. या गोळ्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत ३ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. वॉलीवर पिन्झ याला आज प्रथम सत्र न्यायदंडाधिकार्यांसमोर उभे केले असता न्यायदंडाधिकार्यांनी त्याला ७ दिवसांची कोठडी फर्मावली.
Sunday, 2 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment