काणकोण, दि. २ (प्रतिनिधी)
आगोंद प्रादेशिक आराखडा समितीतर्फे करण्यात आलेल्या सर्व सूचनांना फाटा देण्यात आल्याने काल सरपंच मिलाग्रीना फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. शासनाने घोषित केलेल्या ‘काणकोण तालुका आराखडा २०२१’ला या बैठकीतविरोध करण्यात आला. घोषित प्रादेशिक आराखडा २०२१ ला सर्वानुमते विरोध करण्यासाठी या खास बैठकीत आगोंद नागरिक समिती व अन्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सरपंच मिलाग्रीन फर्नांडिस यांनी हा घोषित प्रादेशिक आराखडा २०२१ लौकरच ग्रामसभेत सर्वांसाठी उपलब्ध करणार येणार असून, यानंतर सर्वांच्यामतानुसार निर्णय घेण्यात येणार आहे असे म्हटले आहे.
आगोंद ग्राम प्रादेशिक आराखड्यात समितीतर्फे सुचविण्यात आलेल्या सूचनांचा फाटा देऊन एक वेगळाच आगोंद ग्राम आराखडा प्रादेशिक आराखडा २०२१ च्या समितीतर्फे पंचायतीत पाठविल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सुधारित २०२१ आराखड्याची प्रत सरकारने कधीच आगोंद पंचायतीत पाठविली नाही , त्यामुळे येथील नागरिकांनाही त्याबद्दल माहिती उपलब्ध झाली नाही.
Tuesday, 4 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment