वास्को, दि. १ (प्रतिनिधी): नवीन वर्ष साजरे करून उशिरा रात्री घरी परतत असताना गाडीचे टायर ङ्गुटून झालेल्या अपघातात गोवा क्रिकेट संघटनेचे क्रिकेटपटू शेरबहादूर यादव (अलङ्गताह क्लब) व हेमंत शेटगावकर (सर्वोदया स्पोर्टस् अकादमी) किरकोळ जखमी झाले. कोलवा येथून वास्कोला येत असताना झुआरीनगर राष्ट्रीय महामार्गावर सँट्रो गाडी उलटून हा अपघात झाला. गोव्यात सुरू असलेल्या ‘जीपीएल ट्वेंटी ˆ २०’ स्पर्धेतील शेरबहादूर यादव हा सर्वांत महागडा खेळाडू असून उद्या २ रोजी तो उपांत्य फेरीत खेळणार आहे, हे उल्लेखनीय!
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही खेळाडू जीए-०६-डी-०७२३ क्रमांकाच्या सँट्रो गाडीतून घरी परतत होते. झुआरीनगर येथील एमईएस कॉलेज जंक्शन जवळ गाडीचा टायर ङ्गुटल्याने गाडीने तीन कोलांट्या खाल्ल्या व पुन्हा उभी राहिली. यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दरम्यान, शेरबहादूर याच्याशी संपर्क साधला असता, उद्या होणार्या सामन्यात आपण खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. तसेच, हेमंत शेटगावकर सुखरूप असल्याची माहिती त्याने दिली. शेरबहादूरने रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे तर हेमंतने विविध स्तरावर गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे.
Sunday, 2 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment