केंद्र सरकारचीच उलटी भाषा
-संपुआ सरकारची दडपशाही
-कर्नाटकातून जम्मूकडे जाणारी गाडी गनिमी काव्याने परतवली
-छत्तीसगडमधून जम्मूकडे जाणारी गाडीही रद्द
-देशभरात भाजपा कार्यकत्यार्र्ंची धरपकड
-राष्ट्रध्वज ङ्गडकवण्याचा भाजयुमोचा निर्धार कायम
नवी दिल्ली/अहमदनगर, दि. २३
कुठल्याही परिस्थितीत प्रजासत्ताकदिनी श्रीनगरच्या लाल चौकात भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज ङ्गडकवणारच, असा निर्धार भाजयुमोने केला असतानाच, हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी संपुआ सरकारने दडपशाहीचा अवलंब सुरू केला असून, कर्नाटकमधून तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांची रेल्वेगाडी महाराष्ट्राच्या सीमेवरून परत पाठवली आणि छत्तीसगडमधून यात्रेसाठी जाणार्या कार्यकर्त्यांची रेल्वेगाडीच ऐनवेळी रद्द केली. याशिवाय तिरंगा यात्रेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काश्मीर खोर्यात कडक सुरक्षा ठेवण्यात आली असून, देशभरात भाजपा कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे.
केंद्र आणि जम्मू-काश्मीर सरकारने कितीही दडपशाही केली तरी प्रजासत्ताकदिनी श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज ङ्गडकविण्यावर आपण ठाम असल्याचे, भाजयुमोने आज पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी कर्नाटक भाजयुमोचे कार्यकर्ते बंगलोर येथून २३ डब्यांच्या एका विशेष रेल्वेगाडीतून श्रीनगरकडे निघाले होते. कार्यकर्ते गाढ झोपेत असताना मध्यरात्रीनंतर अडीच वाजता ही गाडी मनमाड स्थानकाजवळ येताच पोलिसांनी ही गाडी थांबविली आणि गाडीचे इंजीन दुसर्या बाजूला लावले. पोलिसांची कुमक असलेले आणखी दोन डबे जोडून कडक सुरक्षा व्यवस्थेत गाडी बंगलोरकडे रवाना केली. पोलिस, राज्य राखीव पोलिस दल आणि रेल्चे पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करताना गाडीतील सर्व दिवे बंद करण्यात आले होते.
ही गाडी पहाटे सोलापूरला पोहोचतात आपण परतीच्या मार्गावर जात असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी अक्कलकोट स्थानकापासून एक किमी अंतरावर कडपगाव ङ्गाटा येथे चेन ओढून गाडी थांबवली आणि प्रचंड घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोलापूरचे भाजपा आमदार सिद्धरामअप्पा पाटील आणि असंख्य कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी झालेल्या सभेत कर्नाटक भाजयुमोचे अध्यक्ष सुनील कुमार यांनी सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध केला.
रायपूरची विशेष गाडी रद्द
दरम्यान, तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी छत्तीसगड भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आरक्षित केलेली विशेष गाडी रेल्वे प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता ऐन वेळेवर रद्द केल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी रायपूर रेल्वे स्थानकात संपुआ सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यातून सुमारे ३५०० भाजयुमो कार्यकर्ते जाणार होते. श्रीनगरला जाण्यासाठी सर्व कार्यकर्ते रेल्वेस्थानकावर पोहोचले असतानाच दुपारी दोन वाजता निघणारी ही गाडी रेल्वे प्रशासनाने रद्द केल्याची घोषणा केली. नाराज कार्यकर्त्यांनी संपुआ सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून रेल्वेस्थानक दणाणून सोडल्यामुळे परिस्थिती चिघळू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त कुमक तैनात केली.
खोर्यात कडक सुरक्षा
जम्मू-काश्मीर सरकारने भाजयुमोच्या तिरंगा यात्रेला मनाई केली असल्याने भाजपा कार्यकर्ते श्रीनगरमध्ये दाखल होऊ नये यासाठी सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहेे. श्रीनगरकडे कूच करण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी निमलष्करी दलाच्या सुमारे १०० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पंजाबमधून राज्याच्या कठुआ जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी प्रवेश करू नये यासाठी लखनपूर आणि नागरी नरोला येथेही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय, उधमपूर व खोर्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्या जवाहर बोगद्याच्या दोन्ही बाजूला निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेच्यादृष्टीने दरवर्षी स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी हा बोगदा काही तासांकरता बंद ठेवण्यात येतो. यावेळी तिरंत्रा यात्रा रोखण्यासाठी हा बोगदा २५ जानेवारीपासूनच बंद करण्याच्या पर्यायावर प्रशासन विचार करत आहे. दरम्यान, तिरंगा यात्रा अयशस्वी करण्यासाठी संपूर्ण देशभरात भाजपा कार्यकर्त्यांची जोरदार धरपकड सुरू आहे. जम्मू येथील भाजपा कार्यालयाभोवती पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या या दडपशाहीचा कडक शब्दात निषेध केला आहे. दरम्यान, जम्मूधील भाजपा कार्यालयावर कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून जणू काही पोलिसांनी हे कार्यालय आपल्या ताब्यातच घेतले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Monday, 24 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment