पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): गेली १५ ते २० वर्षे कदंब महामंडळात कंत्राट पद्धतीवर बदली चालक म्हणून काम करणार्या ६८ चालकांना सेवेत कायम करण्यात येणार आहे. आज त्यासंदर्भात झालेल्या बैठकीत त्या दिशेने पाऊल उचलण्यात आल्यामुळे या अन्यायग्रस्त चालकांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
हे ६८ बदली चालक गेली अनेक वर्षे सेवेत कायम करावे यासाठी रोजगार न्यायालयात लढा देत आहेत. त्यंाना सेवेत कायम करण्याचे आश्वासनही व्यवस्थापनाकडून अनेकदा देण्यात आले. मात्र पुढे कसलीच कार्यवाही झाली नाही. मात्र कदंबच्या वर्धापनदिनी दिलेल्या आश्वासनानुसार आज रोजगार न्यायालयात रोजगार आयुक्त फातिमा रॉड्रिग्ज, कामगार नेते पुती गावकर व कदंबचे कार्मिक अधिकारी टी. के. पावशे यांच्यात बैठक होऊन तीत या सर्व कर्मच्यार्या सेवेत कायम करण्याच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. त्यासाठी कदंब महामंडळाने ११ फेब्रुवारीपर्यंत मुदत मागितली आहे. त्या दिवशी या कर्मचार्यांना सेवेत कायम केले जाण्याची शक्यता आहे.
Wednesday, 26 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment