म्हापसा, दि. २७ (प्रतिनिधी): राज्यात आज करासवाडा म्हापसा व व्हाळशी डिचोली येथे झालेल्या दोन वेगळ्या अपघातांत दोघे जण ठार झाले. सकाळी पावणेआठच्या सुमारास कोलवाळ - पणजी बसच्या चाकाखाली येऊन मोहम्मद आमीन नामक अठरा वर्षीय युवक जागीच ठार झाला. तसेच व्हाळशी डिचोली येथे मारुती स्विफ्टची ठोकर बसून बसप्पा हा चाळीस वर्षीय पादचारी जागीच ठार झाला.
करासवाडा म्हापसा येथे घोटनीच्या वहाळाजवळ रस्त्यावरून आमीन चालत निघाला होता. मागून येणार्या बसच्या (जीए ०३ के ०४२३) बाजूचा भाग लागल्याने तो पडला आणि पाठीमागचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे तो तेथेच गतप्राण झाला. म्हापसा पोलिसांनी पंचानामा करून मृतदेह बांबोळी येथे सरकारी इस्पितळात पाठवला. सदर युवक करासवाडा येथे भंगार अड्ड्यावर काम करीत होता अशी माहिती मिळाली आहे. बसचा चालक राया कशाळकर याला अटक करण्यात आली आहे.
व्हाळशी डिचोलीत एक ठार
दरम्यान, आमच्या डिचोली प्रतिनिधीने पाठवलेल्या वृत्तानुसार डिचोलीहून म्हापशाला निघालेल्या जीए ०३ सी ६३८६ या क्रमांकाच्या मारुती स्विफ्टची धडक बसून बसाप्पा नामक चाळीस वर्षीय व्यक्ती ठार झाली. बसाप्पा रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी स्विफ्टच्या चालकाने ब्रेक लावला. तरीही बसाप्पा सुमारे ३५ मीटर फरफटत गेला. याप्रकरणी चालक चंद्रसेन दलाई (म्हापसा) याला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Friday, 28 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment