पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)
ख्रिसमस आणि नववर्ष याच महिन्यात येत असल्याने सरकारी कर्मचार्याबरोबर निवृत्त कर्मचार्यांनाही आज वेतन देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार सेवत असलेल्या सरकारी कर्मचार्यांना आज वेतन मिळाले. मात्र, निवृत्त झालेले कर्मचार्यांना पणजीत येऊन रिकाम्या हाताने परत जावे लागले. यावेळी त्यांच्या तोंडावर केवळ या कॉंग्रेस सरकारच्या विरोधातील संताप आणि पणजीत येण्यासाठी लागलेल्या त्रासाच्या छटा दिसत होत्या.
सरकारला दिलेली शब्द पाळत येत नाही तर, त्यांनी गप्पच राहावे. खोटी घोषणाबाजी करून लोकांना निदान त्रास तरी करू नये, अशा शब्दांत आपला राग निवृत्त कर्मचारी व सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी खजिनदार एल एल. वाडगी यांनी व्यक्त केला. सरकारने जाहीर पत्रक काढून या कर्मचार्यांना आज वेतन दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे काही निवृत्त कर्मचारी तर आपल्या थकलेल्या पत्नीचा आधार घेत पणजीला आले होते. यावेळी वेतन घेण्यासाठी बँकेत शिरले असता त्यांना त्यांचे वेतन आज झालेच नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना वेतन न घेता माघारी फिरावे लागले.
Thursday, 23 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment