नवी दिल्ली, दि. १८ : भारतीय जनता युवा मोर्चा १२ जानेवारीपासून १५ दिवसांची ‘राष्ट्रीय एकता यात्रा’ प्रारंंंंंंभ करीत असून ११ राज्यांचा प्रवास करून ही यात्रा अखेर २६ जानेवारी रोजी श्रीनगर येथील लालचौकात पोचेल व तेथे तिरंगा ङ्गडकवील. या यात्रेदरम्यान दहशतवाद व भ्रष्टाचाराच्या मुद्यासह अनेक मुद्यांवर केंद्रातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.
भाजयुमोचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, ११ जानेेवारी २०११ ला म्हणजे स्वामी विवेेकानंद यांच्या जन्मदिनी ‘राष्ट्रीय एकता यात्रे’ला कोलकाता येेेथून प्रारंभ होईल आणि शेवट २६ जानेवारी रोजी श्रीनगरमधील लालचौकात भारताचा तिरंगा ङ्गडकावून होईल.
मोदींनी डागली राहुलवर तोफ
मुंबई, दि. १८ : भारतातील नेतेच जर अमेरिकेला हिंदू दहशतवादी जास्त घातक असल्याचे सांगत असतील तर, पाकिस्तानबाबत अमेरिका एवढी मवाळ का? याचे उत्तर आपल्याला कळले असेलच. अशा शेलक्या भाषेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर तोङ्ग डागली.
कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी अमेरिकन राजदूतांकडे केलेले वक्तव्य नुकतेच विकिलिक्सने उघड केले. त्यात राहुल यांनी लष्कर-ए-तोयबापेक्षा हिंदू दहशतवादी हे देशासाठी अधिक घातक असल्याचे म्हटले आहे. या विधानानंतर विरोधकांनी राहुल यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला.
जगातील सर्व देशांनी पाकिस्तान हा दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश असल्याचे मान्य केले आहे. तेथे दहशतवाद हाही एक मोठा उद्योग आहे. अशा पाकिस्तानच्या बाजूने कायमच अमेरिका बोलते, यामागे असे नेते कारणीभूत असतात अशी पुष्टीही यावेळी मोदी यांनी जोडली. या सार्या भाषणांमध्ये त्यांनी राहुल गांधी यांचे थेट नाव घेणे मात्र कौशल्याने टाळले.
तसेच हिंदुत्ववादी नेत्या उमा भारती यांनीही राहुल यांच्यावर टीका केली आहे. राहुल यांचे हे वक्तव्य बेजबाबदार असून संपूर्ण कॉंग्रेस पक्षच बेजबाबदारपणे वागत आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या दहशतवाद्यांनी केली होती. देशाला लष्कर-ए-तोयबापासून सर्वाधिक धोका असून राहुल गांधींनी समजूतदारपणे वक्तव्य करावे, असा सल्लाही भारती यांनी दिला.
Sunday, 19 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment