पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)
‘बहुचर्चित’ सनबर्न पार्टीच्या आयोजनाबाबत आज (गुरुवारी) पोलिस खात्याने आपली बाजू गृह खात्याकडे स्पष्ट केली आहे. त्यामुळे रात्री उशिरा सनबर्न पार्टीला परवानगी मिळाल्याची जोरदार चर्चा सुरू होती. परंतु, कोणीही या माहितीला दुजोरा दिला नाही. त्याचप्रमाणे, पोलिसांनी आपल्या निवेदनात नेमके काय म्हटले आहे, हे सांगण्यास उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी नकार दिला. काय स्थिती आहे, हे आम्ही सदर निवेदनात स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.
गृहमंत्री रवी नाईक यांनी या पार्टीला परवानगी दिली नसल्याचे काल स्पष्ट केले होते. तर, आयोजकांनी पार्टीला परवानगी मिळाल्याला दावा केला आहे. त्यामुळे गृहखाते आणि पार्टीचे आयोजकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. येत्या २७ ते २९ डिसेंबर या दरम्यान ही पार्टी कांदोळी येथे समुद्र किनार्यावर होणार आहे. कांदोळीवासीयांनी मात्र या पार्टीला कडाडून विरोध दर्शवला आहे.
Friday, 24 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment