Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 22 November 2010

भारतीय पॅनोरमाचा आरंभ "मी सिंधुताई सकपाळ'ने

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) - इफ्फी २०१० च्या भारतीय पॅनोरमाच्या शुभारंभ हा प्रसिद्ध समाजसुधारक सिंधूताई सकपाळ याच्या जीवनावर आधारलेला ""मी सिंधूताई सपकाळ'' या चित्रपटाने होणार आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडलेल्या हा चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी गोव्यातील चित्रपटप्रेमींना मिळाली आहे.
त्याचप्रमाणे, २६ चित्रपट आणि २१ कथाबाह्य चित्रपटांचा गुच्छ या भारतीय पॅनोरमाद्वारे महोत्सवात सादर करण्यात येणार आहेत. कथाबाह्य विभागात "लिव्हींग होम क्रोनिकल्स-इंडियन ओशन' हा एचआयव्हीग्रस्त के. एच प्रदीपकुमार सिंग यांच्या जीवनावरील माहितीपट दाखवण्यात येणार आहे.
भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष पाच कालबाह्य (जुन्या) चित्रपटांच्या पुनर्निमितीने साजरे करीत आहे. तसेच, सुप्रसिद्ध चलचित्रकार व्ही के. मूर्ती बहुआयामी निर्माते डी. रामानायडू या दोन भारतीय चित्रपटांच्या दिग्गजांना यावर्षी दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्यासह दोन चित्रपटांची निर्मिती करण्यात आली असून ते चित्रपट या महोत्सवादरम्यान दाखवले जाणार आहेत.
देशभरातील विविध राज्यांतर्फे आलेल्या २१ कालबाह्य चित्रपट दाखविण्यात येणार आहे. अचतुंग बेबी (बीवेअर) हा लघुपट तर अव्हल (तामीळ), नौटंकी (हिंदी) संगीतावर आधारित चित्रपट दाखविण्यात येईल. "गोईंग द डिस्टंस' हा एचआयव्हीग्रस्त महिलेवर आधारित चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

No comments: