वास्को, दि. २३ (प्रतिनिधी): गेल्या पाच दिवसांपासून गोव्यात "एचपी' गॅस सिलिंडर पुरवठ्यात मोठी घट झाली असून पुढील काही दिवसांत सर्वसामान्यांना गॅस सिलिण्डर मिळणेच दुरापास्त होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. कळंगुट येथे सदर आस्थापनाच्या ग्राहकांची मोठी बाजारपेठ आहे. मात्र तिथेच आज मंगळवारी गॅस सिलिंडरची कमतरता निर्माण झाल्यामुळे तणाव निर्माण झाला. त्यातून एका विक्रेत्याला मारहाणही झाल्याचे वृत्त आहे.
संपूर्ण गोव्यात एचपी गॅस सिलिण्डरचे २ लाख ६० हजारच्या आसपास ग्राहक आहेत. त्यातही कळंगुट, डिचोली, माशेल या भागांत ९९ टक्के ग्राहक हे एचपीचेच आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या भागांतील ग्राहकांचीही मोठी गैरसोय होण्याची चिन्हे आहेत. गोव्याच्या अन्य भागांतही गॅस सिलिंडर मिळणे कठीण होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सदर प्रकाराबाबत अधिक माहिती घेण्यासाठी एचपी गॅस सिलिण्डर व्यवस्थापनाचे गोवा विभागीय व्यवस्थापक एम. वसंतराव यांच्याशी संपर्क साधला असता गेल्या शुक्रवारपासून गोव्यात एचपी गॅस सिलिण्डरची मोठी कमतरता निर्माण झाल्याची माहिती त्यांनी दिली व येत्या पाच - सहा दिवसांत ही परिस्थिती अशीच राहील असे ते म्हणाले. संपूर्ण गोव्यात दर दिवशी सात हजार गॅस सिलिंडरांचा पुरवठा होत असतो, मात्र सध्या हा आकडा आकडा तीन हजारांच्या आसपास पोहोचल्याचे ते म्हणाले. एचपी गॅस सिलिण्डरचा अर्धा साठा (एल.पी.जी.) विदेशातून येत असल्याची माहिती वसंतराव यांनी देऊन गेल्या काही दिवसांपूर्वी खोल समुद्रात झालेल्या वादळामुळे जहाजे हा साठा घेऊन पोहोचलीच नसल्याचे सांगितले. गोव्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबईहून साठा मागवल्याचेही ते म्हणाले.
Wednesday, 24 November 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment