श्री श्री रविशंकर यांचा आरोप
मडगाव, दि. २६ (प्रतिनिधी) : काश्मीर प्रश्र्न चिघळण्यास संपूर्णतः राजकारणी जबाबदार असल्याचा ठपका जागतिक ख्यातीचे आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी यांनी आज येथे ठेवला व सांगितले की हा प्रश्र्न आता मानवीय दृष्टिकोनातून सोडविण्याची गरज आहे.
आज येथील रवींद्र भवनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना अयोध्येतील विवाद व सध्या धुमसत असलेल्या काश्मीर प्रश्र्नावर त्यांचे मत काय, असा सवाल केला असता त्यांनी हे मतप्रदर्शन केले. सध्या न्यायालयीन कात्रीत लोंबकळत असलेल्या अयोध्येतील बाबरी -रामजन्मभूमी विवादप्रकरणी खरी गरज शांतीची आहे. अशी शांती देशाच्या भवितव्यासाठी गरजेची आहे, असे ते म्हणाले. येत्या २८ रोजी न्यायालयीन निवाडा जरी कोणाच्याही बाजूने लागला तरी देशाला गरज आहे ती शांततेची. ही शांतताच देशाला प्रगतीकडे घेऊन जाईल, असे त्यांनी नमूद केले.
प. पू. गुरुजींनी तत्पूर्वी विद्यार्थ्यांकडील सुसंवाद कार्यक्रम चालू असताना त्यांना मोबाईलवरून आलेल्या संदेशाचे वाचन करून काश्मीर स्थितीबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली व तेथील परिस्थिती चिघळण्यास राजकारणीच जबाबदार आह्ेत, असे म्हटले. आज आपणाला आलेल्या संदेशांमुळे आपणही चिंतीत झालेलो आहे व काश्मीर समस्या लवकरात लवकर व मानवीय दृष्टिकोनातून सुटावी म्हणून आपण स्वतः राष्ट्रीय नेत्यांशी बोलणी करणार असल्याचा संकेत दिला.
Monday, 27 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment