नमक्कल, दि. ३१ - दक्षिणेतील ट्रकचालकांनी उद्यापासून बेमुदत संपाचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय महामार्गावर वसूल करण्यात येणाऱ्या टोलची राशी कमी करण्यात यावी, अशी या ट्रकचालकांची मागणी आहे.
या संपाच्या आवाहनामुळे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पुदुचेरी येथील सुमारे २२ लाख वाहनांची वाहतूक १ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ठप्प होणार आहे. ही माहिती तामिळनाडू ट्रक चालक महासंघाचे अध्यक्ष के. नल्लाथम्बी यांनी दिली. केंद्र सरकारने एका वाहनासाठी १.४५ रुपये प्रती किलोमीटर हा दर ठेवला असताना खाजगी संस्था मात्र टोल नाक्यावर ३.४५ रुपये दराने वसुली करीत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. आमच्या या मागणीचा विचार करण्यात आला नाही तर या संपाचे स्वरूप व्यापक केले जाईल आणि ६ ऑगस्टपासून संपूर्ण देशातील ट्रकचालक या संपात सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले.
Sunday, 1 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment