देहरादून, दि. १ - उत्तर काशी व गंगोत्रीदरम्यान आज सकाळी एक ट्रक खोल दरीत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत ट्रकमधून प्रवास करणाऱ्या कमीतकमी २३ कावडधाऱ्यांचा (शिवभक्तांचा) मृत्यू झाला आहे. गंगोत्रीजवळ शिवभक्तांचा दुर्घटनेत मृत्यू होण्याची गेल्या काही दिवसांतील ही दुसरी घटना आहे.
उत्तर काशीमधील भटवाडी तालुक्याचे एसडीएम एस. एल. सेमवाल यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, आज सकाळी आठ वाजता उत्तर काशीपासून ५५ किमी अंतरावरील भटवाडी भागात येणाऱ्या गगनानी व डबरानीदरम्यान एका पुलाजवळ झालेल्या या दुर्घटनेनंतर २३ कावडधाऱ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. दरीत कोसळलेला ट्रकही सापडला असून इतर शिवभक्तांचा शोध घेतला जात आहे. या ट्रकमधून कमीत कमी २५ शिवभक्त प्रवास करीत होते, असे सेमवाल यांनी सांगितले.
हे शिवभक्त गुडगाव येथील रहिवासी होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Monday, 2 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment