वाळपई, दि. ३१ (प्रतिनिधी) - उत्कर्षा मृत्युप्रकरणी तपास करत असलेल्या वाळपई पोलिसांना तिची मामी स्नेहल गावकर हिच्या घरी विशिष्ट द्रव्यरूप पदार्थाने अर्धी भरलेली बाटली सापडली असून ते द्रव्य नेमके कोणते आहे याचा शोध घेण्यासाठी ती हैदराबाद फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आली आहे.
ही माहिती उपअधीक्षक बॉस्केट सिल्वा यांनी दिली. उपअधीक्षकांसह वाळपई पोलिस निरीक्षक हरीष मडकईकर यांनी काल रात्री उत्कर्षाला ज्या खोलीत कोंडून ठेवण्यात आले होते त्या खोलीची तपासणी केली असता अंथरुणाखाली एका शीतपेयाच्या बाटलीत द्रव्यरूप पदार्थ कपड्यात गुंडाळून ठेवलेला त्यांना आढळून आला. त्या द्रव्याला उग्र वास येत होता. त्यामुळे हे द्रव्य कसले आहे ते समजल्यावर या प्रकरणावर प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, पोलिसांनी अन्य संशयितांच्या मोबाईलचा तपास सुरू केला आहे.
स्नेहल गावकर हिचे आई वडील संतोष व सुमेधा राऊत यांची सात दिवसांची पोलिस कोठडी उद्या संपत असल्यामुळे उद्या त्यांना पुन्हा न्यायालयात उभे केले जाईल.
Sunday, 1 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment