चोडण येथे अंत्यसंस्कार
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) - चोडण येथील ३५ वर्षीय व्यक्तीला दुबई येथे स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याने गेल्या रविवारी त्याचे उपचार घेत असताना निधन इस्पितळात निधन झाले. काल रात्री त्याचा मृतदेह दाबोळी विमानतळावर पोचल्यानंतर आज सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नोकरीसाठी आखाती देशात असलेल्या तरुणाचा मृतदेह गावी पोचल्याने चोडण गावात दुःखाचे सावट पसरले आहे. ३५ वर्षीय दामोदर सुर्लकर हा दोन वर्षापूर्वी नोकरीसाठी दुबई येथे गेला होता. काही दिवसांपूर्वी त्याला ताप येत असल्याने दुबई येथील अल मुक्ता या इस्पितळात त्याच्यावर तीन दिवस उपचार सुरू होते. परंतु, गेल्या रविवारी त्याचे निधन झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
"स्वाईन फ्ल्यू' तापाने मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह विमानतळावर आल्याची माहिती विमानतळ सूत्रांनी आरोग्य खात्याला दिल्यानंतर चोडण येथील आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र तांबा यांनी अंत्यसंस्कार होईपर्यंत त्याठिकाणी लोकांना मार्गदर्शन केले. अधिक माहितीसाठी त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी मात्र ते उपलब्ध झाले नाहीत.
Saturday, 19 September 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment