मी पंतप्रधानपदाचा दावेदार नाही; मोदींची घोषणा
दिल्ली, दि.१७ - संपूर्ण देशासाठी आदर्श ठराव्यात अशा योजना राबविणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे देशातील काही उद्योगपती भावी पंतप्रधान म्हणून बघत आहेत. मात्र खुद्द मोदींनीच आपण पंतप्रधानपदाचे दावेदार नसून लालकृष्ण अडवाणीच आमचे नेते व पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाच आपले पंतप्रधानपदासाठी समर्थन असून तेच आमचे नेते आहेत अशी स्पष्टोक्ती गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी दिली. परिणामी पंतप्रधानपदाचे दावेदार कोण, यासंदर्भात सुरू असलेल्या वादालाही आता पूर्णविराम मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची प्रतिमा चांगलीच उजळली असून व्हायब्रंट गुजरात शिखर संमेलनात यूनायटेड अरब अमिरात, ओमान, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया आणि अन्य २२ मुस्लिम देेशांसोबतच अरब लीगचे औद्योगिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. तसेच त्यांनी मोदींविरुद्ध मुस्लिमविरोधी असा जो दुष्प्रचार केला जातो त्यालाही यामुळे परस्पर उत्तर मिळाले. जगावर मोदींच्या मुस्लिमविरोधी प्रतिमेचा कोणताही विपरित परिणाम झाला नसल्याचे या संमेलनाने सिद्ध झाले.
Sunday, 18 January 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment