वॉशिंग्टन, दि. २२ : अमेरिकी सिनेटमध्ये ९४ मते मिळवून परराष्ट्रमंत्री पदाच्या दावेदार ठरलेल्या अमेरिकेच्या माजी प्रथम महिला आणि न्यूयॉर्कच्या सिनेटर हिलरी क्लिंटन यांचा शपथविधी आज पार पडला.
आज हिलरी यांनी शपथ घेतली त्यावेळी त्यांचे पती आणि माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी हातात बायबल घेतले होते. यापूर्वीच्या बुश यांच्या प्रशासनात परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी कोंडोलिजा राईस यांच्याकडे होती. हिलरी या अमेरिकेतील ६७ व्या परराष्ट्रमंत्री ठरल्या आहेत. यापूर्वी त्यांना परराष्ट्रमंत्रिपद देण्यावर सिनेटमध्ये चर्चा झाली होती. अपेक्षेनुरूप त्यांच्या बाजूने ९४ मते पडली आणि त्यांच्याविरुद्ध दोन मते होती. त्यांच्याविरुद्ध मतदान करणारे दोन्ही सिनेटर रिपब्लिकन आहेत.
क्लिंटन फाऊंडेशनसंदर्भात काही सिनेटर्सनी हिलरीवर आक्षेप घेतला होता. या फाऊंडेशनच्या माध्यमातून क्लिंटन दाम्पत्य आर्थिक लाभ मिळवित असल्याचा आरोपही करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर हिलरी यांच्या परराष्ट्रमंत्रिपदाला विरोध करण्यात आला. पण, आज अखेर त्यावर चर्चा होऊन मतदान झाले आणि हिलरी परराष्ट्रमंत्रिपदावर विराजमान झाल्या.
Friday, 23 January 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment