Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 19 January 2009

तांबोसे येथे ट्रक-कार
अपघातात तिघे ठार
लातूरहून आलेल्या पर्यटकांचा बळी

मोरजी, दि. १८ (वार्ताहर) - तांबोसे - तोरसे पेडणे येथे टाटा इंडिका कार व ट्रक यात भीषण अपघात होऊन चेतन मंडेकर (४०) संतोष सुर्वासे (२८) व नितीन साठे हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूरचे तीन रहिवासी ठार झाले. दोघेजण जागीच ठार तर जखमी अवस्थेत आझिलो इस्पितळ-म्हापसा येथे उपचारासाठी नेला असता एक जण तेथे मरण पावला.
सविस्तर माहितीनुसार तोरसे पेडणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वर रविवारी सायंकाळी ४ वाजता म्हापसामार्गे पत्रादेवी जाणारी टाटा इंडिका कार क्र. एमएच. २५ आर. २१५१ व विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्र. जीअॆ ०३ टी ४२४० यांच्यात भीषण अपघात होऊन इंडिका गाडीतील तिघेजण ठार झाले.
इंडिका कारचा घटनास्थळी चक्काचूर झाला. अपघात घडताच ट्रक चालक कुमार राठोड याने पलायन केले. अपघाताची वार्ता कळताच दशरथ परब यांच्या मार्गदर्शनाखाली "१०८' वाहन घटनास्थळी पोचले व गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला आझिलो, म्हापसा येथे उपचारासाठी नेण्यात आले. तेथे उपचार चालू असताना तिसरा मरण पावला.
दरम्यान, लातूर उस्मानाबाद येथील टाटा इंडिका कारमधून प्रवीण बाबूराव होले, दिनकर बोगाडे, मयूर कुलकर्णी, नितीन साठे, चेतन मंडेकर व संतोष सुर्वास हे सहाजण गोव्यात आले होते. त्यातील प्रवीण हेले, दिनकर बोगाडे व मयूर कुलकर्णी हे तोरसे येथील एका हॉटेलात विश्रांती घेत होते तर नितीन साठे, चेतन मंडेकर व संतोष सुर्वास हे तिघेजण इंडिका कारमधून पेडणे मार्गे तोरसेला येताना अपघात झाला.
अपघाताची पुनरावृत्ती
मागच्या १७ जानेवारी २००८ रोजी मालपे पेडणे येथे भीषण अपघात होऊन १२ जण ठार झाले होते. त्या अपघातात झारापकर यांच्या ट्रकला त्या ठिकाणी अपघात झाला होता व ट्रक चालक जळून खाक झाला होता. त्याच मालकाचा ट्रकाला पुन्हा एक वर्षे १ दिवस होऊन तांबोसे - तोरसे येथे अपघात घडला.
अपघाताची माहिती पेडणे पोलिसांना मिळताच म्हापसा पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील उपनिरीक्षक अर्जुन तळवे, केशव परब व इतर पोलिस घटनास्थळी हजर झाले. गाडीत अडकून पडलेल्या मृतदेहांना पोलिसांनी व पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी काढण्यास सहकार्य केले.
दरम्यान, उपस्थित लोकांनी सांगितले की ट्रक चालक व इंडिका कार ही दोन्ही वाहने सुसाट धावत होती. ट्रक चालकाने इंडिका कारला समोरासमोर धडक दिल्याने भीषण अपघात घडला. त्याने स्वतःट्रक रिव्हर्स घेऊन झाडाला आदळला व तो पळाला.
दरम्यान, पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालक कुमार राठोड अपघात करुन फरारी झाल्याबद्दल त्यांच्यावर ३०४ कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys