Monday, 24 November 2008
सत्यव्रत शास्त्री यांना संस्कृतसाठी ज्ञानपीठ
नवी दिल्ली, दि. २३ - संस्कृतचे गाढे अभ्यासक सत्यव्रत शास्त्री यांना साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. शास्त्री यांनी तीन महाकाव्ये लिहिली असून त्यामध्ये एक हजारांहून अधिक श्लोक आहेत. श्रीबोधिसत्वचरितम, बहुत्तमभारतम व वैदिक व्याकरण या त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृती होत. साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. संस्कृतसारख्या विस्मृतीत जात असलेल्या भाषेतील साहित्यिकाला हा बहुमान प्राप्त झाल्याची ही घटना दुर्मीळच म्हणावी लागेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment