रायपूर, दि. २५ : छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरूंगाच्या साह्याने एक पूल उडवून दिला. यात सुरक्षा दलाचे पाच जवान शहीद झाले तर दोन जवान जखमी झाले आहेत, असे बस्तर क्षेत्राचेे पोलिस महानिरीक्षक ए. एन. उपाध्याय यांनी सांगितले.
बस्तर जिल्ह्यातील मरदापाल व कोंडागाव पोलिस ठाण्यांतर्गत येणारा एक पूल नक्षलवाद्यांनी स्फोटकांच्या साह्याने उडवून लावला. यावेळी सुरक्षा दलाचे जवानांचे वाहन पुलावरून जात होते. बस्तरमधील ३३ स्थानांवर सोमवारी फेरमतदान घेण्यात आले होते. यापैकी नाहकानार, तुमडीबाला व कुधुर या मतदानकेंद्रावरील फेरमतदानावर हे जवान तैनात होते. आज मंगळवारी मरदापाल येथून कोंडागावकडे ते रवाना झाले असताना नक्षलवाद्यांनी उपरोक्त स्फोट घडवून आणला.
या घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळाकडे अतिरिक्त पोलिस दल रवाना करण्यात आले असून जखमींना दवाखान्यात दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Wednesday, 26 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment