साहित्यिक रवींद्र भट
यांचे पुण्यात निधन
पुणे, दि. २२ - संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी रवींद्र भट यांचे आज पहाटे पुण्यातील घरी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कादंबरीकार-कवी म्हणून भट यांनी मराठी साहित्य विश्वात मोलाची भर घातली. संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. इंद्रायणी काठी, जय जय रघुवीर समर्थ, भेदिले सूर्यमंडळा या त्यांच्या कांदबऱ्या गाजल्या. संत ज्ञानेश्वर हा जणू त्यांच्या अभ्यासाचा श्वास व ध्यास होता. ते कधीच संत ज्ञानेश्वर असे म्हणायचे नाहीत. त्याऐवजी ते ज्ञानोबांचा उल्लेख आत्यंतिक आदराने "माऊली' असा करायचे. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात दुःख व्यक्त करण्यात आले.
Sunday, 23 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment