मुंबई, दि. २४ : संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते व गायक रामदास कामत यांची नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आहे. यावर नाट्य वर्तुळात रंगलेल्या वादावर पडदा पडला आहे.
काल रविवारी येथे झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. बीड येथे होणाऱ्या ८९ व्या नाट्य संमेलनात रामदास कामत यांना संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करण्यात येतील. अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे ८९ वे नाट्य संमेलन बीड येथे ३१ जानेवारी ते एक फेब्रुवारी २००९ या कालावधीत होत आहे.
अध्यक्षपदासाठी वामन केंद्रे यांचा अर्ज अवैध ठरविल्यानंतर मराठवाड्यातील रंगकर्मींनी त्याविरुध्द प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या; परंतु अ. भा. मराठी नाट्य परिषद घटनेबाबत ठाम राहिली. नियमांच्या चौक टीत राहून त्यांनी रामदास कामत व विश्वास मेहंदळे या दोन उमेदवारांत गुप्त मतदान पध्दतीने निवडणूक घेतली होती.
निवडीवर आनंद व्यक्त करताना रामदास कामत म्हणाले, गेली ४५ वर्षे संगीत रंगभूमीची जी सेवा केली त्या माझ्या कारकीर्दीचा हा गौरव आहे. संगीत रंगभूमीला पुन्हा वैभवाचे दिवस कसे येतील याकडे मी माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत लक्ष देईन, असे कामत म्हणाले.
पं. गोविंदराव अग्नी, पं. जितेंद्र अभिषेकी, भालचंद्र पेंढारकर यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेऊन अनेक दिग्गज दिग्दर्शकांच्या संगीत नाटकांत त्यांनी भूमिका केल्या आहेत. संशयकल्लोळ, मृच्छकटिक, शारदा, मानापमान, मस्यगंधा, ययाती-देवयानी, हे बंध रेशमाचे, मीरा मधुरा, होनाजी बाळा, मंदारमाला आदी नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजलेल्या आहेत.
Tuesday, 25 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment