नवी दिल्ली, दि.२५ : मालेगाव बॉम्बस्फोटाची चौकशी करणाऱ्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस प्रवीण तोगडिया यांना "क्लीन चिट' दिली आहे. यासंदर्भात खुलासा करताना एटीएसने म्हटले आहे की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विहिंपच्या कोेणत्याही नेत्याचे नाव आलेले नाही.
एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी एका टीव्ही चॅनेलने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, आम्हाला जे काही टेलिफोन नंबर प्राप्त झाले आहेत त्यात प्रवीण तोगडिया यांचेही नाव आहे. केवळ फोन कॉल्सच्या आधारावर आम्ही पुढील चौकशी करू शकत नाही.
कालच प्रवीण तोगडिया यांनी अहमदाबाद येथे स्पष्ट केले होते की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाशी माझा तिळमात्र संबंध नाही. याबाबतच जे काय वृत्त प्रसिध्द झाले आहे ते निखालस खोटे आहे. अशाप्रकारच्या बातम्या देणाऱ्या वृत्तसंस्था, वृत्तवाहिन्या यांच्या विरोधात आपण कायदेशीर कारवाई करू , असा इशाराही त्यांनी आपल्या वकिलाच्यामार्फत दिलेला आहे. काल सोमवारी एका इंग्रजी वृत्तपत्रात अशी बातमी आली होती की, मालेगाव बॉम्बस्फोटात समोर आलेल्या अभिनव भारत या संस्थेला प्रवीण तोगडिया यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.
एटीएसविरोधात म.प्र.त याचिका दाखल
दरम्यान, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) विरोधात मध्यप्रदेशच्या उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली आहे. इंदूरच्या एका व्यक्तीला जबरदस्तीने आपल्याबरोबर घेऊन जाणे व त्याला बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात ठेवण्याचा एटीएसवर आरोप करण्यात आलेला आहे. याचिकेनुसार एटीएसच्या पथकाने १० नोव्हेंबर रोजी इंदूर येथून दिलीप पाटीदार नावाच्या व्यक्तीला जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेत त्याला बेकायदशीरपणे आपल्यासोबत घेेऊन गेले होते.
Wednesday, 26 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment