पणजी, दि.२७ (प्रतिनिधी): आपल्या अवतीभोवती अनेक मंदिरे आहेत, ती सर्व धर्मस्थळे आहेत. त्याठिकाणी हिंदुत्व जागविण्याचे कार्य व्हायला हवे, असे मत कुंडई येथील तपोभूमीचे पीठाधीश स्वामी ब्रह्मेशानंदाचार्य यांनी केले. मेरशी येथील धर्मजागरण सभेत ते बोलत होते.
हिंदू हा देशाचा प्राण आहे असे सांगून स्वामी ब्रह्मेशानंदाचार्य यांनी आपल्या पूर्वजांची पुण्याई टिकवायची असेल तर आपली भूमाता, जमीन विदेशीना विकू नका, असे आवाहन समस्त गोमंतकीयांना केले. आपल्या देशात राहून देशद्रोही कारवाया करणाऱ्यांना नष्ट करण्याची वेळ आली आहे, असे बजरंग दलाचे गोवा समन्वयक विनायक च्यारी यांनी यावेळी सांगितले.गाईंची होणारी हत्या रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने पावले न उचलल्यास हत्या करण्यासाठी आणण्यात येणारी गुरे पोलिस ठाण्यावर घेऊन येऊ, असा इशारा त्यांनी दिला. ही वेळ येऊ नये असे वाटत असेल तर सरकारने पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले. हिंदू जनजागृती समितीचे नेते जयेश थळी यांचेही यावेळी भाषण झाले. सभास्थानी स्वामींचे आगनन होताच हेमंत गोलतेकर यांनी त्यांची पाद्यपुजा केली.
यावेळी प्रशांत वेंगुर्लेकर, पुंडलीक कळंगुटकर, अवधूत शिरोडकर, उल्हास नाईक, भरत नाईक, हेमंत गोलतेकर, प्रकाश नाईक, प्रमोद तुयेकर, जयवंत कळंगुटकर यांचा स्वामींच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. खास अतिथी डॉ. सी.पी.दास यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
सकाळी ९.३ वाजता स्वामींनी सातेरीमंदिर, कार्मीभाट, स्वामी समर्थ मंदिर, हनुमान मंंदिर, सातेरी मंदिरांना भेट दिली व देवदर्शन घेतले. ६५ जोडप्यांनी स्वामींची पाद्यपुजा केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment