गावडोंगरी, दि. २७ (वार्ताहर): गालजीबाग समुद्र किनाऱ्यावर आज संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास तिघेजण बुडाले त्यात एकाच घरातील वडील व मुलाचा मृत्यू झाला, त्यामुळे गुदिनो कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
कारवार येथील शेजवड भाड या गावातील वडील डानीयर काजबीर गुदिनो (वय ४५), मुलगा इनासियो गुदिनो (वय १६) आणि मित्र पेट्रीक फर्नांडिस (वय ४५) यांना मरण आले.
कारवार येथील गुदिनो परिवार सहकुटुंब आपल्या गालजीबाग येथील नातेवाईकांकडे रविवार दि. २७ रोजी सकाळी आले होते. संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास फिरण्यासाठी वडील, मुलगा, मित्र मिळून गालजीबाग येथील चर्चच्या पाठीमागे असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी गेले. सर्वजण आंघोळीसाठी उतरले, त्यावेळी प्रथम मुलगा पाण्यात बुडत असल्याचे दिसत असताना त्याला वाचविण्यासाठी वडील श्री. डानीयर गुदिनो मुलाच्या मदतीसाठी गेले असता नियतीने पितापुत्राचा बळी घेतला. इतक्यात आपल्या मित्राला व मित्राच्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या पेट्रीक फर्नांडिसलाही आपला प्राण गमवावा लागला. हे सर्व घडत असताना आणखी एक त्यांचा दोस्त त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत होता. सुदैवाने एका दगडाला हात ठेवून तो पाण्यात राहिला अन्यथा त्याचाही बळी गेला असता अशी माहिती त्याच्या नातेवाईक व पोलिस सूत्रांनी दिली.
श्री. गुदिनो यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी व एक लहान मुलगी असा त्यांचा परिवार आहे.
इनासियो गुदिनो हे इनासियो गुदिनो हा इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिस बना नाईक दिली. गेल्या पाच दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी आणखी एका व्यक्तीचा बळी गेला होता त्यामुळे गालजीबाग येथील समुद्र किनारा धोकादायक ठरला असून आज बुडून मरण पावल्याने संख्या वाढली आहे. तीनही व्यक्तींना शवविच्छेदनासाठी मडगाव येथे दाखल करण्यात आला आहे.
Sunday, 27 April 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment