संयुक्त राष्ट्र, दि. १० : आंतरराष्ट्रीप दबावामुळे पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेत एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यात सुरक्षा परिषदेने लष्कर-ए-तोयबाची मूळ दहशतवादी संघटना जमात-उद-दवाला आतंकवादी संघटना घोषित केले तर या संघटनेला बेकायदा ठरवून तिच्यावर बंदी घालणे शक्य असल्याचे म्हटले आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे षडयंत्र लष्करने रचल्याचा संशय आहे.
लष्कर किंवा अन्य कोणत्याही दहशतवादी संघटनांना आम्ही आमच्या भूमीवर प्रशिक्षण शिबिरे उभारू देणार नाही असे आश्वासन पाकने जागतिक समुदायाला दिले आहे. भारताने सुरक्षा परिषदेकडे जमात-उद-दवा आणि या संघटनेच्या सूत्रधारांवर बंदी घातली जावी अशी विनंती केली होती. त्यानंतर संयुक्त राष्ट्रातील पाकचे राजदूत अब्दुल्ला हुसेन हारून यांनी सुरक्षा परिषदेत प्रतिज्ञापत्र सादर केले.
सुरक्षा परिषदेने जर जमातवर बंदी घातली तर पाकिस्तान या संघटनेची संपत्ती गोठविण्यासाठी कारवाई करेल असे दहशतवादावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान हारून यांनी सांगितले. ही चर्चा मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यांवर केंद्रीत होती. मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी नागरिकांचा हात असल्याचा जो आरोप केला आहे, त्यानुसार आम्ही चौकशी सुरू केली असल्याची माहितीही पाकच्या राजदूतांनी दिली.
Thursday, 11 December 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment