अगरतळा.दि. ७ - आसाममध्ये बर्डफ्लूची लागण झाल्यानंतर त्रिपुरा आणि मिझोराम या पूर्वोत्तरातील इतर दोन राज्यांनीही यासंबंधी सूचना जारी केली आहे.
आसामात बर्डफ्लूच्या धोक्यामुळे गेल्या दहा दिवसात १,००,०००हून अधिक कोंबड्या मारण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने व्यापाऱ्यांना, आसाममधून कोंबड्यांची आयात न करण्याविषयी सूचना केली असल्याचे मिझोरामच्या पशुपालन तथा पशुचिकित्सक संचालकांनी सांगितले. अधिकाऱ्यांनाही राज्याच्या सीमेवर दक्षता पाळण्याचे सांगण्यात आले आहे. मिझोराममध्ये बर्डफ्लूशी संबंधित कुठलीच घटना अजून समोर आली नसली तरी निष्काळजीपणाने ही बाब हाताळली जाऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.
त्रिपुरानेही बर्डफ्लूची सूचना जारी केली आहे. त्रिपुरामध्ये बर्डफ्लूच्या धोक्याचा सामना करण्यासाठी ८०हून जास्त त्वरित कारवाई दले सज्ज असल्याचे राज्याच्या पशुसंसाधन विभागाच्या उपसंचालकांनी सांगितले.
Monday, 8 December 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment