पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) - केपे येथे झालेल्या मूर्ती तोडफोड प्रकरणात अटक केलेल्या कवेश गोसावी याची नार्को चाचणी घेण्याची परवानगी आज केपे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिली आहे. याच प्रकरणात काल रात्री वाळपई येथून खलील अहमद या २८ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
केपे येथे झालेल्या मूर्ती तोडफोड प्रकरणात या दोघांची सहभाग असल्याचा संशय असून तसे काही पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. त्यांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी कवेश याची मुंबईत नार्को चाचणी केली जाणार आहे. खलील अहमद याला आज केपे प्रथम वर्ग न्यायालयात उभे करून सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे.
काला रात्री अटक केलेल्या खलील अहमद याचा पासर्पोट, वाहन परवाना व एका सुरक्षा रक्षक कंपनीच्या ओळख पत्रावर वेगवेगळे निवासाचे पत्ता असल्याचे गुन्हा अन्वेषण विभागाला आढळले आहे. तसेच खलील वापरत असलेला मोबाईल क्रमांक हा कवेश वापरत होता, तर कवेश याच्या नावावर असलेला मोबाईल क्रमांक खलील याच्या नावावर होता, असे तपास उघड झाले आहे. या टोळीत अन्य व्यक्ती असण्याचीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्यांचे बोलणे "कॉन्फरन्सिंग' पद्धतीने होत असे अशी माहिती सूत्रांनी दिली.
Friday, 12 December 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment