Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 10 December 2008

जयंत पाटील नवे गृहमंत्री

मुंबई, दि. ९ : मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नव्या मंत्रीमंडळाचे खाते वाटप आज करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही त्यांच्या मंत्रीपदामध्ये बदल केले आहेत. छगन भुजबळ यांनी गृहमंत्रालय नाकारल्यामुळे जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. तर उर्जामंत्री दिलीप वळसे-पाटीलांकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नारायण राणे यांना पक्षातून निलंबित केल्यावर त्यांचे महसूल खाते बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आले आहे. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाचा भार देण्यात आला आहे. तर आधी आरोग्य मंत्री असलेल्या विमल मुंदडा यांना सार्वजनिक बांधकाम-उपक्रम हे खाते देण्यात आले आहे.
दिलीप वळसे पाटील यांच्याकडील उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय राजेश टोपे यांना देण्यात आले आहे. तर उर्जा खाते सुनिल तटकेर यांना देण्यात आले आहे. रमेश बंग यांना अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात आले आहे. नगरविकास राज्यमंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कामगार मंत्री म्हणून नवाब मलिक यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रीच्या निवडीबाबत कॉंग्रेसने घातलेला घोळ कॉंग्रेसच्या खाते वाटपाबाबतही सुरुच आहे.

No comments: