पणजी, दि.९ (प्रतिनिधी): म्हादई प्रकरणी गोवा प्रदेश भाजपचे शिष्टमंडळ या महिन्याअखेरीस कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची भेट घेणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी दिली. म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी असल्याने या नदीचे गोव्यासाठी असलेले महत्त्व त्यांना पटवून दिले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
आज पत्रकारांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना गोवा भेटीचे आमंत्रण प्रदेश भाजपने दिले आहे.म्हादईचा विषय सुरुवातीस पक्षीय पातळीवर सोडवण्याचे प्रयत्न केले जातील. गरज भासलीच तर या विषयावरून लढा देणाऱ्या संघटनांना त्यात सामावून घेतले जाईल. म्हादईविषयी गोव्याचे हित जपणे हे प्रदेश भाजपचे प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे या संदर्भात कर्नाटकची समजूत काढण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाच्या मदतीची गरज पडली तर तीही घेण्यात येईल असे श्री. नाईक यांनी स्पष्ट केले.
Saturday, 9 August 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment