पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) : गोव्यातील नामवंत उद्योजक फेर्मिना खंवटे, प्रदीप खंवटे व यशपाल रायकर यांना येथील आज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या तिघांविरुद्ध शेकपूर पाटणा बिहार येथील प्रथम वर्ग न्यादंडाधिकाऱ्यांनी अजामीनपात्र वॉरंट पाठवल्याने त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर न्यायालयालाने प्रत्येकी १० हजार रुपयांच्या हमीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच तीस दिवसांत शेकपूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजेरी लावून नियमित जामीन मिळवण्यासाठी मंजुरी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार १२ जुलै ०८ तारीख असलेला अजामीनपात्र अटक वॉरंट पाठवून उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना फेर्मिना खंवटे, प्रदीप खंवटे व यशपाल रायकर यांना अटक करण्याचा आदेश दिला होता. भारतीय दंड संहितेच्या ४२० व ४०६ कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्या वॉरंटमधे नमूद केले आहे. तर फौजदारी गुन्हा क्रमांक १०२ सी. ०८ शेकपूर पाटणा बिहार येथील पोलिस स्थानकावर ही तक्रार दाखल झाली आहे. तथापि, सदर तक्रार बिहार राज्यात कोणी व कशासाठी दाखल केली आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment