जम्मू, दि. ६ : अमरनाथ देवस्थान समितीच्या सर्व सदस्यांनी राज्यपाल एन.एन.व्होरा यांना आपले राजीनामे आज सादर केले आहेत.
दरम्यान, जम्मूत जमीन हस्तांतरण प्रश्नी आंदोलन छेडणाऱ्या श्री अमरनाथ संघर्ष समितीने आपल्या भूमिकेत लवचिकता दाखविण्यास नकार दिला आहे. समितीस देण्यात आलेली शंभर एकर जमीन देण्याचा रद्द करण्यात आलेला निर्णय बदलल्याशिवाय तोडगा निघणार नसल्याचे संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनी राजधानीत बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत जम्मूमधील नागरिकांना तसेच संघर्ष समितीस शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. चर्चेतून तोडगा निघणार नाही असा कोणताही प्रश्न नसल्याचे गृहमंत्री शिवराज पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
या बैठकीत गृहमंत्री व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेत्यांना राज्यातील परिस्थितीबाबत माहिती दिली.
Thursday, 7 August 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment