नवी दिल्ली, दि. ६ ः राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी महाऱाष्ट्राचे राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचा राजीनामा स्वीकारला असून नव्या राज्यपालाची नियुक्ती होईपर्यंत गोव्याचे राज्यपाल एस. सी. जमीर यांच्याकडे महाराष्टाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांनी कर्नाटकच्या राजकारणात सक्रीय होण्यासाठी काल राज्यपाल पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला. मे महिन्यामध्ये कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये राष्ट्रपती राजवटीची मुदत २८ मे रोजी संपत आहे. कर्नाटकमध्ये भाजपाचा वाढता प्रभाव असल्याने आगामी निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने एस. एम. कृष्णा यांना कर्नाटक पाठविण्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी घेतला आहे.
Thursday, 6 March 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment