पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)ः सां जुजे दी आरीयाल या पंचायत क्षेत्रात येणाऱ्या
सर्व खडीच्या खाणी येत्या चार दिवसांत बंद करण्याचा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने दिला आहे. या खडीच्या खाणींमुळे गावात प्रदूषण होत असल्याने ग्रामस्थांनी न्यायालयाला पत्र पाठविले होते. न्यायालयाने पत्राची दखल घेऊन जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतली होती.
त्यानंतर न्यायालयाने चिंचणी, सां जुजे दी आरीयाल व साझोर या परिसरात असलेल्या सुमारे ४१ खडीच्या खाणी त्वरित बंद करण्याचे आदेश सरकारला दिला होता. त्यानुसार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला हे काम सोपवण्यात आले होते. गेल्या एका महिन्यात ४१ पैकी फक्त २४ खाणी बंद करण्यात आल्या असून अन्य खाणींचे मालक न मिळाल्याने त्या बंद करता आल्या नसल्याचे उत्तर मंडळाने न्यायालयाला दिले. हे उत्तर फेटाळून लावून त्या मालकांचा शोध घेऊन चार दिवसांत राहिलेल्या सर्व खणी बंद करण्याचा आदेश आता दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
Wednesday, 5 March 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment