Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 12 February 2008

जनतेला विश्र्वासात घेऊनच
पावले उचलू ः अगरवाल

वास्को, दि. ११ (प्रतिनिधी)- मुरगाव बंदराचा विकास होणे गरजेचे आहे, मात्र येथील जनतेला विश्र्वासात घेतल्याशिवाय एमपीटीने कोणतेही पाऊल आजवर उचललेले नाही व यापुढेही उचलणार नाही, अशी ग्वाही एमपीटीचे चेअरमन प्रवीण अगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
एमपीटीच्या विस्तारासाठी खारीवाडा मच्छीमारी जेटीची जागा गरजेची असून तेथील मच्छिमारांना हलवण्यासाठी पूर्वी सांत जासिंतो व चिखली येथे जागा पाहिली होती. मात्र, जनतेने त्याला विरोध केल्याने सरकारने त्याला नकार दिला. नंतर वाडे येथे जेटी उभारण्याचा विचार होता, परंतु येथेही जनता विरोध करीत असून कोणाला मच्छिमारांच्या हिताची पर्वा नसल्याचे अगरवाल म्हणाले.
अजूनपर्यंत मच्छीमारी ट्रॉलर मालकांना एमपीटीनेच सुविधा पुरवल्या असून नवीन जागी जेटी उभारण्यासाठी त्यांच्याचकडून पैसे खर्च केले जाणार असल्याचे श्री. अगरवाल पुढे म्हणाले. खारीवाडा येथील जेटीची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात येईल व जोवर एमपीटी दुसरी तजवीज करीत नाही, तोपर्यंत येथील मच्छिमारांना हटवले जाणार नाही, अशी ग्वाहीही अगरवाल यांनी दिली.
हार्बर येथील खुरीस हलवण्याचा निर्णय एमपीटीने घेतला असल्याचे काही वृत्तपत्रांनी दिलेले वृत्त ही निव्वळ अफवा असल्याचे ते म्हणाले.
आंदोलकांनी कायदा हातात घेऊन एमपीटीचे दोन ट्रॉलर समुद्रात बुडवल्याचा आरोप अगरवाल यांनी केला.आंदोलन सुरूच राहील ः सायमन
आंदोलन सुरूच राहील अशी माहिती मुरगाव बचाव अभियानचे प्रवक्ते सायमन परेरा यांनी "गोवादूत'ला दिली. एमपीटीचे ट्रॉलर आंदोलकांनी बुडवले या आरोपात काही तथ्य नसल्याचे ते म्हणाले.

No comments: