शैक्षणिक साहित्य खरेदीत
लाखो रुपयांची अफरातफर
खांडोळा महाविद्यालय प्राचार्यांची तक्रार
माशेल, दि. 13 (प्रतिनिधी) - खांडोळा माशेल येथील सरकारी महाविद्यालयात शैक्षणिक साहित्य खरेदी नावावर लाखो रुपयांची अफरातफर झाल्याचे उघड झाले असून या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लूकस् मिरांडा यांनी फोंडा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवून पोलिसांना चौकशी करण्याची विनंती केली आहे.
या प्रकरणी प्राचार्य डॉ. मिरांडा यांची भेट घेऊन चौकशी केली असता त्यांनी सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयातर्फे खांडोळा महाविद्यालयाला मंजूर करण्यात आलेल्या फंडाची चौकशी केली असता त्यांना मंजूर करण्यात आलेल्या फंडापेक्षा तीन पटीने जास्त रकमेचे ज्यात प्रयोगशाळांतील रसायनशास्त्र विभागासाठी तसेच स्टेशनरी साहित्याचा समावेश आहे अशा शैक्षणिक साहित्याची खरेदी केल्याचे सांगितले गेले.
प्राचार्यांनी महाविद्यालयातील खरेदी नोंदी व बिले तपासली असता त्यात त्यांना सुमारे सात-आठ लाखांच्या खरेदीची बिले मिळाली नाहीत. व्यवहारांच्या कागदपत्रांवर दाखविण्यात आलेल्या खरेदीऐवजी प्रत्यक्षात कमी रकमेचे साहित्य महाविद्यालयात पोहोचले असल्यामुळे सविस्तर चौकशीसाठी पोलिस तक्रार करावी लागल्याचे सांगितले. पोलिस तक्रारीत प्राचार्यांनी महाविद्यालयातील एका कनिष्ठ कारकुनाचे नाव नमूद केले आहे.
खांडोळा महाविद्यालयाने गेल्या काही वर्षांत बरीच प्रगती केली असून, प्रत्येक शाखेचा निकाल चांगला लागत असल्यामुळे गोव्याच्या अनेक भागातून विद्यार्थी कला, वाणिज्य व विज्ञान या महाविद्यालयीन शिक्षणासाठी येथे येत असतात.
Thursday, 14 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment