पणजी, दि. १८ (प्रतिनिधी)
राज्य मंत्रिमंडळाची बैठक येत्या २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २६ जानेवारीपासून सरकारतर्फे राज्यात ‘चकाचक’ मोहीम राबवण्यात येणार असून त्यासंबंधीची माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत आपल्या मंत्रिमंडळ सहकार्यांना देणार आहेत.
दरम्यान, याच दिवशी संध्याकाळी कॉंग्रेस विधिमंडळ गटाची बैठकही आयोजित करण्यात आली आहे. ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत विधानसभा अधिवेशन भरणार आहे व त्या अनुषंगाने विरोधकांचा सामना करण्यासाठीची व्यूहरचना आखली जाणार आहे, अशीही माहिती प्राप्त झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते मिकी पाशेको यांच्या मंत्रिमंडळ समावेशास कॉंग्रेसने विरोध केल्याने उभयपक्षांतील संबंध बरेच ताणले गेले आहेत व त्यामुळे त्याचा परिणाम अधिवेशन काळात होऊ नये यासाठी या बैठकीत विचार विनिमय होईल. ड्रग प्रकरणावरून सरकारवर विविध स्तरांतून टीका होत असल्याने तसेच या प्रकरणाच्या ‘सीबीआय’ चौकशीचा रेटा विरोधकांकडून लावला जात असताना पक्षाची भूमिका काय असेल, याचाही निर्णय या बैठकीत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Wednesday, 19 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment