समुद्री चाच्यांविरोधात नवा कायदा
नवी दिल्ली, दि. १६: महासागरांमध्ये भारतीय नौकांचे अपहरण आणि त्यांची लुटालूट होण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन सरकारने समुद्री चाच्यांविरोधात नवा कायदा आणण्याचा विचार केला आहे. जलवाहतूक मंत्री जी. के. वासन यांनी आज ही माहिती दिली. ते म्हणाले की, समुद्री चाचे भारतीय नौकांना प्रचंड उपद्रव करीत आहेत. याला आळा घालण्यासाठी आता सरकार नवा कायदा आणण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघानेही पुढाकार घेतला पाहिजे, असा आग्रह वासन यांनी धरला.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची तक्रार
गुवाहाटी, दि.१६ : आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या पत्नी डॉली यांनी आज शेतकरी नेते अखिल गोगोई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अखिल गोगोई यांनी म्हटले होते की, मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीची अमेरिकेत मालकीची दोन घरे आहेत. त्या ठिकाणी त्यांची मुलगी वास्तव्य करीत असल्याचेही त्यांचे म्हणणे होते. पण, डॉली गोगोई यांनी हे आरोप साङ्ग धुडकावित अखिल गोगोईंविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे डॉली गोगोई यांचे म्हणणे आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने राज्यातील एखाद्या नेत्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
मारकुट्या मुत्सद्याची तातडीने बदली
नवी दिल्ली, दि. १६ : बायकोला अमानुष मारहाण करण्याचा आरोप असणारे वरिष्ठ मुत्सद्दी अनिल वर्मा यांना भारताने तातडीने माघारी बोलाविले आहे. १९८६ च्या तुकडीतील आयएएस अधिकार असणारे वर्मा हे सध्या लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांना दिल्लीला तातडीने पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असून ते सिद्ध झाल्यास कारवाईचीही शक्यता नाकारता येत नाही.
शबरीमाला घटनेचा अहवाल चार दिवसात
वांदीपेरियार, दि. १६ : शेकडो अय्यप्पा भाविकांचा बळी घेणार्या चेंगराचेंगरीच्या घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल येत्या चार दिवसांत सादर होणार आहे. या घटनेची चौकशी करणार्या गुन्हे शाखेच्या चमूचे प्रमुख एस. सुरेन्द्रन यांनी ही माहिती दिली. सहा सदस्यीय चमू या घटनेतील साक्षी-पुरावे गोळा करीत आहे.
Monday, 17 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment