लंडन, दि. १७
जगभरातील बडे उद्योजक, नेते यांच्याकडून होणार्या कथित करबुडवेगिरीचा तपशील असलेली कागदपत्रे स्विस बँकेचे माजी अधिकारी असलेल्या रुडॉल्ङ्ग एल्मेर यांनी ’विकिलिक्स’ला पुरविली असून, त्यात दोन हजार ‘धनवानां’चा समावेश आहे. ही माहिती कधीही उघड केली जाऊ शकते, असे सूत्रांनी स्पष्ट केले. या माहितीत भारतीयांच्या खात्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
ज्युलियन बेअर या स्विझ बँकेचे माजी अधिकारी असलेले एल्मेर म्हणाले की, अमेरिका, ब्रिटन व आशियातील बड्याबड्या हस्ती, उद्योजक, नेते यांच्या खात्यांचा तपशील या कागदपत्रांमध्ये आहे. लंडनच्या ङ्ग्रंटलाईन क्लबमध्ये ’विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांजे यांच्याकडे एल्मेर यांनी ही कागदपत्रे सुपूर्द केली.
एल्मेर यांच्या कृतीची स्तुती करून असांजे म्हणाले की, आम्हाला मिळालेल्या इतर माहितीची जशी शहानिशा केली जाते, तशीच या माहितीची केली जाईल. आणि त्यानंतर त्यांना संकेतस्थळावर प्रसिद्धी दिली जाईल. तत्पूर्वी, अमेरिकी दूतावासाची उरलेली कागदपत्रे प्रसिद्ध करण्यासाठी आमचे काम सुरू आहे.
Tuesday, 18 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment