२३ मजूर जखमी, ५ गंभीर
नवी दिल्ली, दि. २१ : राजधानी दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला अवघे काही दिवसच शिल्लक असताना जवाहरलाल नेहरू स्टेडियमनजीकचा निर्माणाधीन पादचारी पूल आज कोसळला. या अपघातात २३ मजूर जखमी झाले. जखमींपैकी पाच मजुरांची प्रकृती चिंताजनक आहे. सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यासाठी २ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
जवाहरलाल नेहरू स्टेडियम हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या मुख्य सोहळ्याचे स्थान आहे. या स्टेडियमनजीकच म्हणजे दक्षिण दिल्लीतील लोधी रोड परिसरात हा पादचारी पूल उभारण्यात येत होता. काही मजूर पुलाच्या कॉंक्रीटीकरणाचे काम करीत असतानाच हा पूल दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी अकस्मात कोसळला. जखमी झालेल्या २३ पैकी ५ कामगारांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
९५ मीटर लांबीचा हा पादचारी पूल निर्माणाधीन होता. चंदीगड स्थित पीएनआर इन्फ्रा या कंपनीला या पुलाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले होते. १०.५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या पुलाने तयार होण्यापूर्वीच मध्येच जीव सोडल्याने दिल्ली सरकारकडे नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Wednesday, 22 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment