Wednesday, 24 March 2010
चौपदरीकरणाच्या विरोधात पणजीत मोर्चा
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): पणजी ते मोले पर्यंत रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे अनेकांची घरे, दुकाने आणि मंदिरे जात असल्याने या सर्वांनी आज पणजीत कदंब बसस्थानकाच्या समोर धरणे धरून या रुंदीकरणाला विरोध केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी आंदोलनकर्त्यांना भेट देऊन कोणतीच घरे दुकाने आणि मंदिरे चौपदरी मार्गाच्या रुंदीकरणामुळे मोडायला देणार नसल्याचे आश्वासन दिले. यावेळी या रुंदीकरणाचा संभावित फटका बसणारे मोले पासून पणजी भोमापर्यंतचे ग्रामस्थ या धरणे कार्यक्रमात सहभागी झाले होते. या रुंदीकरणामुळे अनेकांची घरे जात असल्याने हे रुंदीकरण योग्य नाही. ज्या ठिकाणी घरे किंवा मंदिरे नाहीत अशा ठिकाणी रुंदीकरण करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. या धरणे कार्यक्रमाचे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे सुनील देसाई व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे लवू मामलेकर यांनी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment