Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 9 July 2011

रुग्णांच्या जिवावरच उठले!
‘‘आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’ करणाच्या नादात आझिलो इस्पितळातील रुग्ण व कर्मचार्‍यांच्या जिवाशी खेळ मांडला आहे. आझिलो इमारत धोकादायक परिस्थितीत असल्याची जाणीव असतानाही गेली दोन वर्षे या इस्पितळाचे स्थलांतर जिल्हा इस्पितळात करण्यात येत नाही. न्यायालयात खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करून वेळ मारून नेण्याचा घृणास्पद प्रकारही सुरू आहे. निदान आता तरी लोकांच्या जिवाशी सुरू असलेला हा खेळ बंद करा.’’
- ऍड. फ्रान्सिस डिसोझा
‘पीपीपी’चे ‘सुपरमरण’
‘‘जिल्हा इस्पितळाचे ‘पीपीपी’करण करून सामान्य लोकांना सुपर स्पेशॅलिटी उपचार देण्याची भाषा करणारे आरोग्यमंत्री रुग्णांना ‘सुपरमरण’ देण्याचीच तयारी करीत आहेत. एकीकडे आझिलोची इमारत कधीही कोसळेल, अशी स्थिती बनली आहे तर दुसरीकडे विश्‍वजित राणे ‘पीपीपी’चे गणीत सोडवत बसले आहेत. आधी रूग्णशय्येवरील रुग्णांना योग्य उपचार द्या व मगच पुढील रुग्णांच्या उपचाराची चिंता करा.’’
- मनोहर पर्रीकर

No comments: