मडगाव,दि. २ (प्रतिनिधी)
मूळ कर्नाटकातील असलेल्या पण सध्या वास्कोत मुक्काम ठोकून असलेल्या ७ जणांच्या एका टोळीला कर्नाटक पोलिसांनी गोव्यात येऊन अटक केल्यावर आज त्यांना मडगाव पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. मडगाव व नावेली परिसरातील घरफोड्या व शटर वाकवून झालेल्या चोर्यांत याच टोळीचा हात असावा असा पोलिसांचा कयास आहे.
कारवार पोलिसांनीही त्यांना याच संशयावरून ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्या या टोळीत मारुती शंकरप्पा बेंगळुरीˆशिर्सी, व्यंकटेश आपय्या सुरेश मुलगुंड, रमेश सुरेश चलवादी उभयता वास्को, नजीर अहमद शिरांगी, सलीम हुसेन शेख, अलीफ मुनरप्पा सागरी व इस्पिताय गोकाक यांचा समावेश होता. मडगाव पोलिसांनी त्यांना कोर्टासमोर उभे करून सात दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे.
दरम्यान, आणखी एका प्रकरणात मडगाव पोलिसांनी चौघांना संशयावरून ताब्यात घेतले व त्यांच्याकडील एक चोरीची मोटरसायकल जप्त केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांची नावे सचिन तुकाराम कोकात, महेश सदाशिव शिंदे, राजेश धर्मू कलगा, स्वप्निल शिरीष काळे अशी असून ते सगळे औरंगाबादमधील आहेत. त्यांच्याकडून जीए ०९ सी ५५७९ ही स्प्लेंडर मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली आहे. अधिक तपास चालू आहे.
दुसरीकडे काल रात्री येथील पिंपळ कट्ट्याजवळ बाबू क्लॉथ सोटोअर व अन्य एक दुकान शटर वाकवून फोडण्यात आले मात्र त्याबाबत पोलिस तक्रार नोंदविण्यात आली नव्हती.
Friday, 3 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment