महानंद पुन्हा निर्दोष
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): सीरियल किलर महानंद नाईक याला आज आणखी दोन खटल्यांतून निर्दोष मुक्त करण्यात आले. तरवळे-शिरोडा येथील दर्शना नाईक व बेतोडा - ‘ोंडा येथील सुनीता गावकर यांच्या खून प्रकरणी पणजी सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी हा निवाडा दिला. पुराव्या अभावी सोळा खुनांपैकी सात खुनाच्या खटल्यात तो दोषमुक्त झाला आहे.
किटला-बेतोडा येथील सुनीता गावकर हिला दि. ३० जानेवारी २००३ रोजी सकाळी ११ वाजता महानंदाने ‘ोंडा येथील सेंट मेरी हायस्कूलजवळ बोलविले. नंतर, बसने तो तिला घेऊन सुर्ला-डिचोली येथील काजूच्या जंगलात गेला. तिथे गळा आवळून त्याने तिचा निर्घृण खून केल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक एम. पालेकर यांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले होते. या प्रकरणात सुनीताचा मृतदेह मिळाला नसल्याने संशयित आरोपीला संशयाचा ‘ायदा मिळू शकला. तर, ती जिवंत असल्याचा दावा संशयित आरोपीतर्‘े करण्यात आला होता.
तरवळे -शिरोडा येथील २१ वर्षीय दर्शना नाईक ही आरोपीची शेजारी होती. २७ सप्टेंबर १९९४ रोजी सकाळी ती घरातून नाहीशी झाल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. बांबोळी वैद्यकीय महाविद्यालयात व सध्याच्या गोवा विद्यापीठ संकुलाच्या मागे असलेल्या झाडीत दर्शनाचा मृतदेह एका काजूच्या झाडाला टांगलेला आढळून आला होता. ‘ोंड्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक पेडणेकर यांनी या प्रकरणी महानंद विरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. मात्र, वैद्यकीय अधिकार्याने तिचा मृत्यू गळ‘ास घेतल्याने झाला असल्याचा अहवाल दिल्याने संशयित आरोपीनेच हा खून केल्याचा पुरावा पुढे येऊ शकला नाही.
महानंद नाईक प्रकरणातील खटले हाताळणारे वरिष्ठ सरकारी वकील सुभाष देसाई यांना महानंदाच्या सुटकेबाबत विचारले असता त्याची सुटका होण्यास विविध कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काहींचे मृतदेह सापडले नाहीत. जास्त खटले जुनेे असल्याने त्या संदर्भातील पुरावे गोळा करणे पोलिसांसाठी कठीण काम होते. अनेक खटल्यात जनुकीय चाचणी (डीएनए टेस्ट) सकारात्मक नाही, एकाही खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळालेला नाही. तसेच, चोरीचे दागिने विकत घेणार्या सोनाराने पोलिसांना सहकार्य करण्याचे टाळले, असे ऍड. देसाई यांनी सांगितले.
Thursday, 2 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment